*कोंकण एक्सप्रेस*
*बारामतीत झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू; संपूर्ण विमान जळून खाक;*
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात; बारामतीत लँडिंगदरम्यान झाला अपघात;*
*डीजीसीएची दिली माहिती*
*पवार कुटुंबीय बारामतीकडे रवाना*
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू; महाराष्ट्रावर शोककळा*
*पुणे:*
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीतील भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात शोककळा पसरली असून सगळ्याच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अजित पवार हे ६६ वर्षांचे होते. राज्याच्या राजकारणात मागील ४० वर्षांपासून अजित पवार यांचा वावर होता. धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता, रोखठोक भाष्य यामुळे अजित पवार चर्चेत राहिले होते.
अजिततदादांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

