*कोकण Express*
*”स्टार्ट द चैन ऑफ व्हॅक्सीनिशन” कणकवली पंचायत समितीचा उपक्रम राबविणार-मनोज रावराणे…*
*पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी,लोकप्रतिनिधी करणार जनजागृती…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे कणकवली पंचायत समितीच्या माध्यमातून लसीकरणाची सर्वाधिक जनजागृती करण्याचे ध्येय हाती घेण्यात आले आहे. ज्या अधिकारी व कर्मचारी,शिक्षक,ग्रामसेवक यांनी लसीकरण करुन घेतले आहे, तेच आपले कुटुंब व सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाऊन किमान दहा लोकांना लसीकरणासाठी “स्टार्ट द चैन ऑफ व्हॅक्सीनिशन” या उपक्रमातुन जनजागृती करणार असल्याची माहिती कणकवली सभापती मनोज रावराणे यांनी दिली.
शासनाने ब्रेक द चैनचे निर्देश दिले आहेत.आता खरी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाची गरज आहे.त्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी,शिक्षक,पंचायत समिती सदस्य,सरपंच,ग्रामसेवक,लोकप्रतिनिधी लसीकरण जनजागृती करणार आहेत,असे मनोज रावराणे यांनी सांगितले.