जिल्हा डोंगरी विकास समितीवर प्रकाश पावसकर निश्चित…

जिल्हा डोंगरी विकास समितीवर प्रकाश पावसकर निश्चित…

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हा डोंगरी विकास समितीवर प्रकाश पावसकर निश्चित…*

*ओरोस : प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डोंगरी विकास समितीवर प्रकाश चंद्रकांत पावसकर यांची निवडनिश्चित झाली असून त्यांचे आमदार निलेश राणे यांनी अभिनंदन केले आहे.जिल्ह्याच्या डोंगरी विकास समिती ही ग्रामीण भागातील विकास कामांना चालना देणारी महत्त्वपूर्ण समिती असून ग्रामीण भागातील आणि डोंगरी तालुक्यातील विविध विकास कामांना चालना दिली जाते केली काही वर्षे पालकमंत्री नितेश राणे झाल्यानंतर ही समिती गठीत करण्यात आली नव्हती जिल्ह्यातील शासनाच्या विविध समित्या गठित करण्याची कार्यवाही सुरू झाली असून या मधील महत्त्वपूर्ण अशा डोंगरी विकास समितीवर मालवण तालुक्यातील सुकळवाड येथील प्रकाश चंद्रकांत पावसकरयांची नियुक्ती निश्चित झाली आहे लवकरच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आचारसंहितासमताच या समितीची यादी अधिकृतरित्या जिल्हा प्रशासनाकडून जाहीर होणार आहे त्यात प्रकाश चंद्रकांत पावसकरयांची वर्णी निश्चित झाली आहे त्यांना नुकतीच शिंदे शिवसेनेचे शुक्रवार पंचायत समिती साठी उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरू होत्या परंतु त्यांच्या ऐवजी अन्य उमेदवारां लाउमेदवारी दिली आहे प्रकाश पावसकर आहेहे शुक्रवार पंचक्रोशीतील विविध संस्था समित्यांवर कार्यरत असून यापूर्वी त्यांनी सुकळवाड गावचे सरपंच तसेच अनेक सदस्य पदीहीकाम केले आहे सध्या विविध संस्थांच्या पदाधिकारी पदाबरोबर कोकण रेल्वे प्रवासी व संघर्ष समितीचे अध्यक्ष पदीकार्यरत आहे ग्रामीण विकासाच्या माध्यमातून महत्वपूर्ण अशा जिल्हयाच्या डोंगरी विकास समितीवर त्यांची वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!