*कोंकण एक्सप्रेस*
*कोलझरमध्ये शिवसेनेचा झेंडा..गणेशप्रसाद गवस बिनविरोध..!*
*दोडामार्ग : शुभम गवस*
दोडामार्ग पंचायत समिती अंतर्गत कोलझर पंचायत समिती मतदारसंघातून एकूण सहा उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. यात शिवसेना, भाजप, महायुती, ठाकरे गट तसेच अपक्ष उमेदवारांचा समावेश होता.
मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे मागे घेतली. यामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार प्रविण परब यांचाही समावेश होता. त्यामुळे या मतदारसंघातून शिवसेनेचे दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस हे बिनविरोध निवडून आले आहेत.
दोडामार्ग तालुक्यात कोलझर पंचायत समिती सदस्याची ही पहिलीच बिनविरोध निवड ठरली असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पालकमंत्री नितेश राणे तसेच आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलले जात आहे

