*कोकण Express*
*रोणापाल येथे काजू बागेमध्ये मृत माकड*
*बांदा ः प्रतिनिधी*
काजू बागायतदार श्री राजेश मयेकर यांच्या काजू बागायतीत मृत माकड सापडला श्री राजेश मयेकर यांनी आरोग्य यंत्रणेशी सकाळी संपर्क साधला असता सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निगुडे आरोग्य सेवक श्री. निळकंठ बांदवलकर यांनी मृत माकडाची पाहणी केली परंतु त्यांनी असे सांगितले की सदर माकडाची विल्हेवाट स्थानिक प्रशासनाने लावायची आहे परंतु त्या माकडावर मारण्यासाठी पावडर वगैरे काही नव्हती त्यांच्याजवळ रोणापाल गावचे सरपंच श्री सुरेश गावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले वनाधिकारी यांचे काम आहे सदर माकडाला काय झालं याचे निदान तर मला समजणार नाही मला काजू बागेमध्ये काजू गोळा करण्यासाठी यावे जावे लागते तसेच माझे नातेवाईक असतात उद्या काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार तसेच वनपाल त्यांच्याशी संपर्क साधला पण कोणीच या माकडाला त्याची विल्हेवाट लावायला तयार नाही त्या माकडाचा कशामुळे मृत्यू झाला याचे सुध्दा निदान नाही संबंधित वनाधिकारी श्री पानपट्टी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणतात की सदर माकड वनखात्याच्या जमिनीमध्ये मृत झाल्यास आम्ही त्याची विल्हेवाट लावू परंतु खाजगी जमिनीमध्ये मृत झाल्यास स्थानिक प्रशासनाने त्याची विल्हेवाट लावायची आहे त्यामुळे शासकीय अधिकारी यांना या गोष्टीचे सोयरसुतक नाही अशी टीकाही श्री राजेश मयेकर यांनी केली जर त्या माकडाची विल्हेवाट लावली नाही तर मी स्वतः लावीन मग माझं काही बरं वाईट झालं तर त्याला संबंधित खात्याचे अधिकारी जबाबदार राहतील.