आडेली पंचायत समिती मतदारसंघातून नितीन मांजरेकर महायुतीचे अधिकृत उमेदवार.

आडेली पंचायत समिती मतदारसंघातून नितीन मांजरेकर महायुतीचे अधिकृत उमेदवार.

*कोंकण एक्सप्रेस*

*आडेली पंचायत समिती मतदारसंघातून नितीन मांजरेकर महायुतीचे अधिकृत उमेदवार..*

*वेंगुर्ले : प्रतिनिधी*

आडेली पंचायत समिती मतदारसंघातून सर्वसाधारण जागेसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून नितीन मांजरेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
आडेली मतदारसंघाकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या मतदारसंघात पंचायत समिती साठी शिंदे शिवसेनेतर्फे उमेश नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आज मंगळवार २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी उमेश नाईक यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले नितीन मांजरेकर यांना महायुतीचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!