*कोंकण एक्सप्रेस*
*देशसेवक सुमंगल परब यांचा हायस्कूलतर्फे सन्मान*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
अणसूर-पाल हायस्कूलचे माजी विद्यार्थी सुमंगल परब यांच्या देशसेवेची दखल घेऊन हायस्कूलतर्फे त्यांचा सपत्नीक सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
सुमंगल परब हे माझगांव डॉक शिपबिल्र्डस लिमिटेड, मुंबई येथे भारतीय नौदलासाठी विविध लढाऊ शिप्स, वाघशीर सबमरीन-पाणबुडी निर्मितीत आपले अमूल्य योगदान देऊन ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांसाठी देशसेवेचा आदर्श निर्माण करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भारतीय सेनादलातील विकास परब, मुख्याध्यापक राजेश घाटवळ, शिक्षक अक्षता पेडणेकर, विजय ठाकर, चारूता परब, संजिता परब आदी उपस्थित होते. सुमंगल परब यांनी विद्याथ्र्यांना भारतीय नौदलासाठी लढाऊ शिप्स व सबमरीन उभारणीत दिलेल्या योगदानाची माहिती दिली. याच कार्यक्रमात अणसूर पाल हायस्कूलचे सन 2004-2005 चे माजी विद्यार्थी विकास परब व निळकंइ गावडे यांनी आपल्या बॅचच्या सर्व विद्याथ्र्यांनी शाळा विकासासाठी संकलित केलेला 51 हजार रूपयांचा निधी हायस्कूलकडे सुपूर्द केला. याबद्दल हायस्कूलच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

