समाजकार्याची शिदोरी, विकासाचा ध्यास; संजय सातार्डेकर निवडणूक रणांगणात

समाजकार्याची शिदोरी, विकासाचा ध्यास; संजय सातार्डेकर निवडणूक रणांगणात

*कोंकण एक्सप्रेस*

*समाजकार्याची शिदोरी, विकासाचा ध्यास; संजय सातार्डेकर निवडणूक रणांगणात…*

*दोडामार्ग ः शुभम गवस*

साटेली–भेडशी पंचायत समिती मतदारसंघातून महायुतीतर्फे भाजपाच्या कमळ चिन्हावर संजय सातार्डेकर यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली असून, त्यांच्या उमेदवारीला प्रदीर्घ व समर्पित समाजसेवेची भक्कम पार्श्वभूमी लाभली आहे. गेल्या बारा वर्षांहून अधिक काळ समाजहिताच्या विविध प्रश्नांसाठी अविरत कार्यरत असलेले संजय सातार्डेकर हे कर्तव्यनिष्ठ, सामाजिक जाणिवा जपणारे आणि जनतेशी थेट संवाद साधणारे नेतृत्व म्हणून परिचित आहेत.
दोडामार्ग तालुक्यातील गंभीर आरोग्यविषयक समस्यांविरोधात उभारलेल्या जनआक्रोश आंदोलनाचे प्रमुख संयोजक म्हणून त्यांनी पक्षीय चौकटींपलीकडे जाऊन तालुक्याच्या सामूहिक हितासाठी नेतृत्व केले. कोरोना महामारीच्या कठीण काळात जनजागृती, अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणात त्यांनी पुढाकार घेतला.
२०१९ च्या महापुरग्रस्तांसाठी मदतकार्य, गरजू कुटुंबांना वस्त्र व अन्नधान्य वाटप, साटेली–भेडशी येथे भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन, रक्तदान शिबिरे, संविता आश्रमातील अनाथ बालकांसाठी सहाय्य, आगीत होरपळलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत, शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व वस्त्रसहाय्य, नशामुक्तीविषयक जनजागृती मोहिमा तसेच युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर सक्रिय सहभाग—अशा असंख्य सामाजिक उपक्रमांत त्यांनी ठोस योगदान दिले आहे.
सामाजिक प्रश्नांवर आंदोलने, उपोषणे आणि मदतकार्यांत सातत्याने अग्रभागी राहिलेल्या संजय सातार्डेकर यांची उमेदवारी म्हणजे विकासाभिमुख, संवेदनशील आणि जनतेच्या दुःखाशी एकरूप होणाऱ्या नेतृत्वाला मिळालेली संधी असल्याची भावना मतदारांमधून व्यक्त होत आहे.
दोडामार्ग तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समाजाशी नाळ जुळलेले, तळागाळातील प्रश्न जाणणारे आणि कृतीतून विश्वास निर्माण करणारे नेतृत्व पंचायत समितीत असणे काळाची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!