पंढरपूरला जाणाऱ्या सर्व एसटी गाड्या मुख्य बसस्थानकापर्यंत नेण्यात याव्यात

पंढरपूरला जाणाऱ्या सर्व एसटी गाड्या मुख्य बसस्थानकापर्यंत नेण्यात याव्यात

*कोंकण एक्सप्रेस*

*पंढरपूरला जाणाऱ्या सर्व एसटी गाड्या मुख्य बसस्थानकापर्यंत नेण्यात याव्यात*

*कणकवली तालुका प्रवासी संघटनेची एसटी महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाकडे मागणी*

*कणकवली ः संजना हळदिवे*

आषाढी, कार्तिकी आणि माधी वारीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने पंढरपूरला जातात. मात्र, एसटीचे चालक आणि वाहतूक नियंत्रक गर्दीचे कारण पुढे करून गाड्या मुख्य बसस्थानकापर्यंत न नेता ३ ते ४ किमी आधीच थांबवत आहेत. यामुळे वारकऱ्यांची होणारी लूट आणि हाल थांबवून सर्व गाड्या मुख्य बसस्थानकापर्यंत नेण्यात याव्यात् अशी मागणी तालुका प्रवासी संघ, कणकवली यांनी एसटी महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडे निवेदनाव्दारे केली आहे.

प्रवासी संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, चालक आणि व्यवस्थापक पंढरपूरच्या अलीकडेच प्रवाशांना उतरवून देतात. यामुळे वारकऱ्यांना एसटीच्या सवलतीचा पूर्ण लाभ मिळत नाही. उलट तिथून मंदिरापर्यंत जाण्यासाठी रिश्नाला ३०० ते ३५० रुपये अव्वाच्या सब्बा भाहे मोजावे लागते. भक्तीच्या वाटेवर असलेल्या गरीब वारकऱ्यांना हा नाहक आर्थिक भुर्वेह सहन करावा लागत आहे.

केवळ प्रवासाच नव्हे, तर जेवणाच्या बाबतीतही वारकऱ्यांची लूट होत आहे. एसटी बस स्थानकावरील अधिकृत उपहारगृहात न थांबवता, चालक गाड्या खाजगी इंटिल्सवर थांबवतात, तिथे जेवणाचे दर जास्त असल्याने वारकऱ्यांचे आर्थिक शोषण होत आहे. त्यामुळे गाळ्या बसस्थानकातच थांबवून तिथेच जेवणाची सोय व्हावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!