*कोंकण एक्सप्रेस*
*देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाचा 1 फेब्रु. रोजी तळबाजार येथे ज्ञाती बांधवांचा वार्षिक गुणगौरव स्नेह व सांस्कृतिक मेळावा.*
*शिरगांव : संतोष साळसकर*
देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळ यांच्या वतीने समाजातील ज्ञाती बांधवांचा वार्षिक गुणगौरव, स्नेह व सांस्कृतिक मेळावा रवि. दि. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दु. 3 वाजता या वेळेत तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यामंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य प्रांतिक तैलिक महासभेचे महासचिव भूषण कर्डिले, विभाग अध्यक्ष डॉ. सतीश वैरागी, वैद्यकीय सेवेतील 50 वर्षे सर्वोत्कृष्ट कामगिरी नागरी सत्कार सन्मानित डॉ. के. एन. नायसे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित जमसंडेकर यांच्या मातोश्री श्रीमती संध्या जामसंडेकर, जि प. चे सेवानिवृत्त अधिकारी नंदकिशोर साळसकर, रत्नागिरी कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आनंद शेलार, महाराष्ट्र राज्य प्रांतिक तैलिक महासभेचे सचिव जयेश बागडे, देवगड शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष जनार्दन तेली, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, मालवणचे काजू उद्योजक सुरेश नेरुळकर, महाराष्ट्र प्रांतिक दैनिक महासभेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष एकनाथ तेली, सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम तेली, देवगड जामसंडे नगरपंचायत च्या पाणीपुरवठा समितीच्या सभापती सौ. तन्वी चांदोस्कर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संदीप तेली, देवगड शिक्षण विकास मंडळाचे खजिनदार मिलिंद खानविलकर, देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाचे माजी खजिनदार नामदेव तेली, माजी सचिव रवींद्र हिंदळेकर, सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण तेली, कोर्ले- धालवली चे सर्वोत्कृष्ट सरपंच पुरस्कार विजेते विश्वनाथ खानविलकर, सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज मंडळाचे सचिव संजय कवटकर, मालवण तालुकाध्यक्ष राजन आचरेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष सौ. सुप्रिया वालावलकर, वैभववाडी तालुका अध्यक्ष महेश डिसोलकर, वेंगुर्ले तालुका अध्यक्ष सुनील नांदोस्कर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्याम निवेलकर, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या सोहळ्याला सर्व ज्ञाती बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अशोक तेली, उपाध्यक्ष नारायण हिंदळेकर, सचिव विजय शेट्ये, खजिनदार दत्ताराम शेलार, आणि सर्व कार्यकारणी सदस्य, महिला आघाडी व संपर्कप्रमुख यांनी केले आहे.

