*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यार्थ्यांनी ज्ञानकक्षा वाढविण्यासाठी एआयचा वापर करावा-शमशुद्दीन अत्तार*
*कणकवली : प्रतिनिधी*
एआय (कृत्रिम बुद्धिमतेचा) वापर सर्व क्षेत्रांत केला जात आहे. यात शिक्षण क्षेत्रही मागे नाही. विद्यार्थ्यांनी आपली ज्ञानकक्षा वाढविण्यासाठी एआयचा प्रवाभीपणे वापर केला पाहिजे. एआय वापर करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सर्वकष ज्ञानदान केले पाहिजे. एआयच्या वापरामुळे मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होईल, असे मत शिरगाव हायस्कूल व ज्यु. कॉलेजचे प्राचार्य तथा एआयचे तज्ज्ञ शमशुद्दीन अत्तार यांनी व्यक्त केले.
गोपुरी आश्रमच्या जीवन शिक्षण उपक्रमांतर्गत आश्रमच्या गणपतराव सावंत सभागृहात एआय आणि अभ्यास व अभ्यासातील एआय या विषयावर आयोजित केलेल्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात श्री. अत्तार बोलत होते. यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, संचालिका अर्पिता मुंबरकर, विनायक सापळे, सदाशिव राणे उपस्थित होते.
शमशुद्दीन अत्तार यांनी अभ्यास करताना एआयचा कसा वापर करावा याची माहिती प्रेझेंटेशनद्वारे दिली. एआयाबाबत विद्यार्थ्यांनी अत्तार यांना विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

