झुंजार नेतृत्वाचा निर्धार :शिवसेना ठाकरे गटाचे  विनिता घाडी रिंगणात..

झुंजार नेतृत्वाचा निर्धार :शिवसेना ठाकरे गटाचे  विनिता घाडी रिंगणात..

*कोंकण एक्सप्रेस*

*झुंजार नेतृत्वाचा निर्धार :शिवसेना ठाकरे गटाचे  विनिता घाडी रिंगणात..*

*दोडामार्ग : शुभम गवस*

“२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण व महिला सक्षमीकरण” या ठाम भूमिकेसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपजिल्हा प्रमुख विनिता घाडी यांनी झरंबांबर पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असून महिला व समाजाभिमुख मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विनिता घाडी या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून महिला सक्षमीकरण, बचतगट, स्वयंसहायता गट, गरजू महिलांना मार्गदर्शन, आरोग्य व शिक्षण विषयक उपक्रम यासाठी त्या ओळखल्या जातात. राजकारण हे समाजकारणाचे साधन असावे, या भूमिकेतून त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्या सांगतात.
माहेरच्या गावातूनच निवडणूक लढवत असल्याने स्थानिक जनतेशी असलेले भावनिक नाते, विश्वास आणि आपुलकी ही त्यांची मोठी ताकद ठरत आहे. “सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी रिंगणात उतरलो आहे” असा ठाम संदेश त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचवला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या विचारसरणीवर विश्वास ठेवत सामान्य जनतेचे प्रश्न, महिलांचे हक्क, गावविकास आणि पारदर्शक प्रशासन हेच आपले प्रमुख मुद्दे असतील, असे विनिता घाडी यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या समाजाभिमुख आणि महिलाकेंद्रित भूमिकेमुळे झरंबांबर पंचायत समिती निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!