*कोंकण एक्सप्रेस*
*वरवडे गावाचा क्रिकेटचा महासंग्राम! ‘वरवडे प्रिमीयर लीग २०२६’ (VPL पर्व ५) चा दिमाखदार सोहळा संपन्न!*
*कणकवली (वरवडे ) ः संजना हळदिवे*
ग्रामस्थ कला क्रीडा मंडळ वरवडे (रजि. नं. सिंधुदुर्ग ००००२४४/२५) यांच्या वतीने आयोजित, सर्वांच्या पसंतीस उतरलेली वरवडे प्रिमीयर लीग २०२६ (VPL पर्व ५) या तीन दिवसीय भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.
दिमाखदार उद्घाटन सोहळा
या स्पर्धेचे शानदार उद्घाटन श्री. संतोष चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. वरवडे गावातील क्रिकेट प्रेमींच्या उपस्थितीत आणि उत्साही वातावरणात या खेळाच्या कुंभाचा नारळ फुटला.
भरघोस बक्षिसांची लयलूट
यंदाच्या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे प्रथम पारितोषिक रु. २५,००१ व आकर्षक चषक असून, हे पारितोषिक श्री. संतोष चव्हाण यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त इतर बक्षिसे खालीलप्रमाणे आहेत:
द्वितीय पारितोषिक: रु. २०,००१ व आकर्षक चषक
मालिकावीर: सायकल आणि आकर्षक चषक
वैयक्तिक पुरस्कार: उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि ‘उगवता तारा’ यांना प्रत्येकी रु. २,००० व चषक.
विशेष आकर्षण: ऑरेंज कॅप, पर्पल कॅप आणि अंतिम सामनावीर (रु. १,०००) पुरस्कार.
महत्त्वाचे कार्यक्रम
स्पर्धेचा कालावधी: २४, २५ व २६ जानेवारी २०२६
बक्षीस वितरण: सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता.
वरवडे गावच्या या ‘अद्भुत सोहळ्यास’ आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. क्रिकेटचा हा थरार अनुभवायला विसरू नका!
आयोजक:
वरवडे प्रीमियर लीग व्यवस्थापन समिती
श्री. संतोष (पपु) पुजारे (अध्यक्ष)
श्री. निलेश सादये (उपाध्यक्ष)
श्री. विनायक घाडीगांवकर (खजिनदार)
श्री. निलेश सावंत (सचिव)

