*कोंकण एक्सप्रेस*
*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात खारेपाटण ग्रामपंचायतीची उपक्रमशील वाटचाल*
*खारेपाटण : प्रतिनिधी*
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत खारेपाटण ग्रामपंचायतीने सक्रिय सहभाग घेतला असून विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामविकासाची प्रभावी वाटचाल सुरू आहे. ग्रामपंचायतीकडून नागरिककेंद्री सेवा अधिक सुलभ व गतिमान करण्यावर भर देण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू करण्यात आली असून त्यामुळे वेळ व खर्चाची बचत होत आहे. तसेच बचत गटातील महिलांना विविध कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. या प्रशिक्षणामुळे महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून ग्रामस्तरावर सकारात्मक बदल घडून येत आहे.
या सर्व उपक्रमांची माहिती देताना खारेपाटण ग्रामपंचायत अधिकारी विशाल वरवडेकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, गती आणि लोकाभिमुखता आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील काळातही नागरिकांच्या गरजांनुसार अधिक उपयुक्त उपक्रम राबवले जाणार आहेत

