राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत मास्टरराज अबॅकस संस्थेची उज्वल कामगिरी

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत मास्टरराज अबॅकस संस्थेची उज्वल कामगिरी

*कोंकण एक्सप्रेस*

*राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत मास्टरराज अबॅकस संस्थेची उज्वल कामगिरी*

*कु. वेदिका साहिल चॅम्पियन तर कु.वैदही सावंत दुसरी रँक ने उत्तीर्ण*

*फोंडाघाट : प्रतिनिधी*

‘मास्टर अबॅकस अकादमी’तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धे मध्ये मास्टर राज अबॅकस संस्थेच्या कुमारी वेदिका भिवा साईल हिला चॅम्पियन, कुमारी वैदेही साईनाथ सावंत ही दुसऱ्या रँकने, कुमार आर्णव राहुल आळते हा दुसऱ्या रँक ने आणि आराध्य अमोल भोसले हा तिसऱ्या रँक ने उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केले त्याबद्दल श्री स्वामी समर्थ मठ,डामरे येथे यशस्वी विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान यावेळी पुढारी दैनिकाचे आवृत्तीप्रमुख गणेश जेठे, श्री स्वामी मठाचे साईनाथ सावंत, मास्टर राज अबॅकस संस्थेच्या संचालिका संगीता आळते मोहन पारकर श्री राणे व विजेत्या विद्यार्थ्यांची पालक उपस्थित होते.
कोरोची इचलकरंजी येथे दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धे मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांतील ४५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कॅल्क्युलेटरवर अवलंबून न राहता, अचूक आणि जलद गतीने गणिते सोडवण्याचे कौशल्य मुलांमध्ये विकसित व्हावे, हा या परीक्षेचा मुख्य उद्देश होता. परीक्षेत ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी विविध स्तर (Levels) निश्चित करण्यात आले होते. अवघ्या काही सेकंदात मुलांनी बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यांसारखी कठीण गणिते तोंडी सोडवून उपस्थितांना थक्क केले.
“अबॅकसमुळे मुलांच्या मेंदूच्या दोन्ही भागांचा विकास होतो, ज्यामुळे त्यांची स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. या स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. विजेत्या मध्ये कुमारी वेदिका भिवा साईल हिला चॅम्पियन, कुमारी वैदेही साईनाथ सावंत ही दुसऱ्या क्रमांकाने, कुमार आर्णव राहुल आळते हा दुसऱ्या क्रमांकाने आणि आराध्य अमोल भोसले हा तिसऱ्या क्रमांकाने घवघवीत यश संपादन केले आहे.
या परीक्षेसाठी पालकांनी मोठा उत्साह दाखवला असून, मुलांच्या बौद्धिक विकासासाठी असे उपक्रम अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. या स्पर्धेसाठी सौ. संगीता आळते यांच्या मार्गदर्शन लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!