गणेश जयंतीनिमित्त सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम उत्साहात ; पालकमंत्री नितेश राणे , नगराध्यक्ष संदेश पारकर यांची उपस्थिती

गणेश जयंतीनिमित्त सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम उत्साहात ; पालकमंत्री नितेश राणे , नगराध्यक्ष संदेश पारकर यांची उपस्थिती

*कोंकण  एक्सप्रेस*

*असलदेत डबलबारी भजनातून बुवांनी केलं समाजप्रबोधन*

*गणेश जयंतीनिमित्त सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम उत्साहात ; पालकमंत्री नितेश राणे , नगराध्यक्ष संदेश पारकर यांची उपस्थिती*

कणकवली : प्रतिनिधी*

असलदे उगवतीवाडी येथील ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्यावतीने गणेश जयंती उत्सव 2026 व सत्यनारायण पूजेनिमित्त आयोजित धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यानिमित्त श्री भुतेश्वर प्रासादिक भजन मंडळ खुडी तालुका देवगड बुवा संतोष जोईल विरुद्ध श्री निनादेवी प्रासादिक भजन मंडळ उंडील बुवा व्यंकटेश नर यांच्यामध्ये झालेल्या डबलबारी सामन्यात दोन्ही बुवांनी समाज प्रबोधनासाठी सुंदर असे विवेचन केले. या गणेश जयंतीनिमित्त पालकमंत्री नितेश राणे , नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट देत कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
ब्राम्हणदेव सेवा मंडळ , असलदे उगवतीवाडी येथे गणेश जयंतीनिमित्त गणेश पुजन, श्री. सत्यनारायणाची महापुजा, महाआरती,भाविकांना महाप्रसाद,महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम,मान्यवरांचे सत्कार,स्थानिक वारकरी भजने असे कार्यक्रम पार पडले. रात्रौ 10 वाजल्यानंतर श्री भुतेश्वर प्रासादिक भजन मंडळ खुडी तालुका देवगड बुवा संतोष जोईल विरुद्ध श्री निनादेवी प्रासादिक भजन मंडळ उंडील बुवा व्यंकटेश नर यांच्यात डबलबारी भजना झाला . कोकणातील सुंदर निसर्गाबद्दल स्वर्गापेक्षा सुंदर आसा ह्यो कोकण , मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कामाव्यतिरिक्त करु नका , त्यामध्ये आईवडील हे देवासमान असून त्यांना दुखवू नका , पती पत्नींमध्ये असलेले संवाद हे चांगल्या संसारासाठी महत्त्वाचे असल्याचा जागर समाज प्रबोधनातून यावेळी दोन्ही बुवांनी करत स्व. बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज , स्वामी समर्थ व विविध देवतांसह हिंदू धर्म रक्षण यासह विविध मुद्द्यांवर अभंग , गजर व अन्य भजनांच्या सादरीकरणातून भजन रसिकांचे मनोरंजन बुवा व्यंकटेश नर व बुवा संतोष जोईल यांनी केले. तसेच बुवा व्यंकटेश नर यांनी डोक्याने हार्मोनियम वाजवत एक अनोखी कला सादर केली. हा गणेश जयंती उत्सव मंडळाच्या ज्येष्ठ,युवक व महिला कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्याने कार्यक्रम यशस्वी पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!