शेवरे येथील श्री ठाणेश्वर व श्री बांदकादेवी मंदिराचा २३ व २४ जानेवारी रोजी वर्धापन दिन सोहळा

शेवरे येथील श्री ठाणेश्वर व श्री बांदकादेवी मंदिराचा २३ व २४ जानेवारी रोजी वर्धापन दिन सोहळा

*कोंकण एक्सप्रेस*

*शेवरे येथील श्री ठाणेश्वर व श्री बांदकादेवी मंदिराचा २३ व २४ जानेवारी रोजी वर्धापन दिन सोहळा*

*यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*

*शिरगाव / संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील शेवरे येथील श्री ठाणेश्वर मंदिराचा वर्धापन दिन शुक्रवार, दि. २३ जानेवारी रोजी तसेच श्री बांदकादेवी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा शनिवार, दि. २४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार, दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता श्री गांगेश्वर अभिषेक, सकाळी ११ वाजता श्री ठाणेश्वर मंदिरात लघुरुद्र व अभिषेक विधी, तर दुपारी १२.३० वाजता महाआरती होणार आहे.
शनिवार, दि. २४ जानेवारी रोजी श्री बांदकादेवी मंदिरात सकाळी ८ वाजता गणेश पूजन, अभिषेक व होम-हवन, सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वाजता महाआरती व मंत्रपुष्पांजली होईल. त्यानंतर दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद, दुपारी ३ वाजता हळदीकुंकू, सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत स्थानिक सुस्वर भजने, रात्री ८ वाजता स्थानिक दिंडी भजन, तर रात्री ९ वाजता बुवा सुशील गोठणकर विरुद्ध बुवा विनोद चव्हाण यांच्यात २०-२० डबल बारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे.
तरी या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी सहकुटुंब व मित्रपरिवारासह उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री ठाणेश्वर–बांदकादेवी सेवा मंडळ, मुंबई तसेच ठाणेश्वर–बांदकादेवी जीर्णोद्धार मंडळ, शेवरे (स्थानिक) यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!