समाजाची संघटना अधिक बळकट करूया – आनंद बांदेकर

समाजाची संघटना अधिक बळकट करूया – आनंद बांदेकर

*कोंकण एक्सप्रेस*

*समाजाची संघटना अधिक बळकट करूया – आनंद बांदेकर*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

वेंगुर्ला तालुक्यात भंडारी समाजाची संख्या सर्वाधिक आहे. मंडळाने तालुक्यातील सर्व गावांचे प्रभाग निर्माण करून त्या त्या प्रभागांत प्रतिनिधींची निवड केली आहे. आगामी काळात प्रत्येक प्रभागामध्ये जनजागृती करून समाजाची संघटना अधिक बळकट करूया असे आवाहन अध्यक्ष आनंद बांदेकर यांनी केले.
भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला तालुक्याची मासिक सभा मंडळाच्या कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा महासंघाचे माजी अध्यक्ष रमण वायंगणकर, अॅड.श्याम गोडकर, गजानन गोलतकर, रमेश नार्वेकर, विकास वैद्य, सदानंद केरकर, दिपक कोचरेकर, भरत आवळे, श्रेया मांजरेकर, श्रेया मयेकर, जयराम वायंगणकर, गुरूनाथ कांबळी, आत्माराम सोकटे, डॉ.सचिन परूळकर आदी उपस्थित होते. या सभेप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाने प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. तसेच मंडळाने एकमताने स्वीकृत सदस्य व सल्लागारपदी नियुक्त केलेल्या डॉ.सचिन परूळकर, गुरूनाथ कांबळी आणि आत्माराम सोकटे यांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. मंडळाचे सचिव डॉ.गोविंद धुरी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!