मिलरॉय, सोहम “बॅ.खर्डेकर श्री’ चे मानकरी

मिलरॉय, सोहम “बॅ.खर्डेकर श्री’ चे मानकरी

*कोंकण एक्सप्रेस*

*मिलरॉय, सोहम “बॅ.खर्डेकर श्री’ चे मानकरी*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

बॅ.खर्डेकर महाविद्यालयात घेण्यात आलेल्या कै.काकासाहेब चमणकर स्मृतिप्रित्यर्थ जगदीश चमणकर पुरस्कृत, किशोर सोन्सुरकर सातेरी व्यायामशाळा मार्गदर्शीत आंतरवर्गीय शरिरसौष्ठव स्पर्धेत मिलरॉय फर्नांडीस आणि सोहम पेडणेकर हे “बॅ.खर्डेकर श्री’चे मानकरी ठरले.
स्पर्धेचे उद्घाटन ऐ·ार्य चमणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ.डी.बी.गोस्वामी, पं.स.चे माजी सभापती जयप्रकाश चमणकर, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे डॉ.वैभव शिंदे, बीकेसी असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र खांबकर, सचिव संजय पुनाळेकर, महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डी.जे.शितोळे, किशोर सोन्सुरकर, एस.एस.पाटील, जिमखाना चेअरमन डॉ.कमलेश कांबळे, ज्युनिअर विभागाचे चेअरमन प्रा.विरेंद्र देसाई, सांस्कृतिक महोत्सव चेअरमन प्रा.पी.एम.देसाई, क्रीडा शिक्षक प्रा.वासुदेव गावडे, अबोली सोन्सुरकर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सिनियर विभागामध्ये मिलरॉय फर्नांडीस हा “बॅ.खर्डेकर श्री’चा मानकरी ठरला. तर हितेश परब आणि जनार्दन गिरप यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविले. तर ओम पवार हा बेस्ट पोझर ठरला.
ज्युनिअर विभागामध्ये सोहम पेडणेकर हा “बॅ.खर्डेकर श्री’ चा मानकरी ठरला. तर प्रणव दाभोलकर व निखिल मोर्जे यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला. तर प्रणव दाभोलकर हा बेस्ट पोझर ठरला. पंच म्हणून सुधीर हळदणकर, सौरभ वारंग, अमोल तांडेल, हेमंत नाईक यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन क्रीडा संचालक प्रा.जे.वाय.नाईक यांनी केले. तर प्रा. हेमंत गावडे यांनी आभार मानले. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!