*कोकण Express*
*सुप्रसिद्ध अनुवाद शरयू पेडणेकर यांचे निधन*
*कणकवली/प्रतिनिधीी*
मूळच्या सिंधुदुर्गच्या (कोळंब) आणि सध्या अलिबाग येथे वास्तव्याला असणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका व अनुवादिका शरयू पेडणेकर (96) यांचे अलिबाग येथे निधन झाले.
हिंदी , इंग्रजीतील उत्तम साहित्य मराठीत आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले . अव्वल कथालेखक व अनुवादक ज्येष्ठ कवी आ.ना पेडणेकर यांच्या त्या पत्नी होत.प्रा. शरयू पेडणेकर यांना अव्वल साहित्याची मर्मज्ञ जाण होती. हिंदी आणि मराठी भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. विभूती नारायण राय यांचं ‘ कर्फ्यू ‘ त्यांनी मराठीत आणलं. असे अनेक पुस्तकांचे अनुवाद केले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी अनुवादिलेलं प्रख्यात संगीतकार अनिल विश्वास यांचं शरद दत्त लिखित चरित्र. पेडणेकर यांच्या निधनाबद्दल साहित्य वर्तुळात दुःख व्यक्त केले जात आहे , त्यांना श्रद्धांजली वाहताना सुप्रसिद्ध कवी डॉ महेश केळुस्कर म्हणाले “आ.ना.पेडणेकर यांच्या दहा कथा १९९१ साली, मी आकाशवाणीवर केल्या होत्या. शरयूताईही पुस्तक परीक्षण वगैरे कार्यक्रमासाठी कधी कधी यायच्या. जुन्या काळात आकाशवाणी थिएटरात बघितलेल्या अनवट सिनेमांच्या आठवणी सांगायच्या
ललित लेखक वैभव साटम म्हणाले त्यांच्या सोबत झालेल्या भेटीत त्या किती साहित्य मर्मज्ञ होत्या हे दिसून आले. त्यांच्या निधनाने दोन पिढ्याचे साहित्य जोडणारा एक दुवा नाहीसा झाला.