वक्तृत्व स्पर्धेत जिज्ञासा परब, वेदांत प्रथम

वक्तृत्व स्पर्धेत जिज्ञासा परब, वेदांत प्रथम

*कोंकण एक्सप्रेस*

*वक्तृत्व स्पर्धेत जिज्ञासा परब , वेदांत प्रथम*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

वेंगुर्ला नगर वाचनालयातर्फे 18 जानेवारी रोजी दोन विविध विषयांवर घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत जिज्ञासा परब आणि वेदांत नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकाविले.
मनोहर शां. भांडारकर वक्तृत्व स्पर्धेसाठी “भटक्या कुत्र्यांचा उपद्रव’ हा विषय ठेवण्यात आला होता. यात प्रथम-जिज्ञासा परब (माध्यमिक विद्यालय, नेरूर), द्वितीय-रिया परब (बॅ.खर्डेकर वेंगुर्ला), तृतीय-गौरी गावडे (कास नं.1, सावंतवाडी) यांनी क्रमांक पटकाविले. तर ज.बा.आरोसकर वक्तृत्व स्पर्धेसाठी “एआय-तंत्रज्ञान’ हा विषय ठेवण्यात आला होता. यात प्रथम – वेदांत नाईक (टोपीवाला हाय.मालवण), द्वितीय – श्राव्या कांबळी, तृतीय-भार्गवराम ओगले (पाटकर हाय.वेंगुर्ला) यांनी क्रमांक पटकाविले. स्पर्धांचे परीक्षण कैवल्य पवार, भाऊ करंगुटकर, मयुरेश सौदागर, दिपराज बिजितकर, महेश बोवलेकर व कर्पूरगौर जाधव यांनी केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे देण्यात आली. कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!