अध:पतन टाळण्यासाठी वाचन चळवळीची आवश्यकता-प्राचार्य गोस्वामी

अध:पतन टाळण्यासाठी वाचन चळवळीची आवश्यकता-प्राचार्य गोस्वामी

*कोंकण एक्सप्रेस*

*अध:पतन टाळण्यासाठी वाचन चळवळीची आवश्यकता-प्राचार्य गोस्वामी*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

वाचनालयांमुळे वाचन चळवळ समृद्ध होते. सध्या टेक्नॉलॉजीकल गॅझेटमुळे वाचकांची संख्या कमी होत आहे. नवनवीन वाचनालये निर्माण करण्याबरोबरच पालकांनी पाल्यांना वाचनाची सवय लावणे गरजेचे आहे. उच्च वैचारिक पातळी असलेली माणसे उच्चपदी पोहचत नाहीत तोपर्यंत आपला विकास होणार नाही. सामाजिक, राजकीय अध:पतन टाळण्यासाठी वाचन चळवळीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी यांनी पुरस्कार प्रदान आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाप्रसंगी केले.
वेंगुर्ला नगर वाचनालयातर्फे विविध दात्यांनी पुरस्कृत केलेल्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यातील विजेत्यांना बक्षिस वितरण आणि दात्यांनी पुरस्कृत केलेले प्रदान असा एकत्रित कार्यक्रम 18 जानेवारी संस्थेच्या लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात घेण्यात आला. यावेळी व्यासपिठावर प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार, सामाजिक कार्यकर्ते रमेश बोंद्रे यांच्यासह पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी यांच्या हस्ते दै.रत्नागिरी टाईम्सचे प्रतिनिधी अभिमन्यू लोंढे (सावंतवाडी) यांना श्रीकृष्ण स.सौदागर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार, कल्पना बांदेकर (सावंतवाडी) यांना स्व.रमाकांत गुरूनाथ शेटये स्मृती आदर्श साहित्यिक पुरस्कार, डॉ.जी.ए.बुवा (सावंतवाडी) यांना सौ.सुशिला श्रीकृष्ण सौदागर स्मृती आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार, श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा यांना कै.विष्णूपंत गणेश नाईक स्मृती आदर्श ग्रंथालय पुरस्कार, कै.प्रा.उदय खानोलकर ग्रंथसंग्रहालय,मळगांवचे कर्मचारी आनंद महादेव देवळी यांना श्रीकृष्ण स.सौदागर स्मृती आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार, स्नेहा धोंडू नारिंगणेकर (शिरोडा) यांना स्व.लक्ष्मीकांत सखाराम सौदागर स्मृती व्यावसायीक साहित्यप्रेमी पुरस्कार तर यावर्षीपासून प्रथमच देण्यात येणारा बालसाहित्यिक पुरस्कार कणकवली येथील महेश पांडुरंग काणेकर यांना देऊन गौरविण्यात आले. सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी आपल्या मनोगतात नगरवाचनालयाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करीत संस्थेचे आभार मानले.
यानंतर संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या श्रीकृष्ण स. सौदागर पुरस्कृत सांस्कृतिक कार्यक्रमातील तसेच अ.ना.शेणई वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचे व सुदत्त कल्याण निधी, कै.पद्माकर सखाराम सौदागर स्मृती चित्रकला स्पर्धा, पं.जनार्दनशास्त्री कशाळीकर, भालचंद्र कर्पे, कै.रामचंद्र विश्राम किनळेकर व श्रीमती मंदाकिनी रामचंद्र किनळेकर स्मृती पारितोषिक व अन्य स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरीत करण्यात आली.
या कार्यक्रमाला संस्थेचे कार्योपाध्यक्ष शांताराम बांदेकर, उपकार्यवाह माया परब, कार्यकारी मंडळ सदस्य राजेश शिरसाट, नंदन वेंगुर्लेकर, दिपराज बिजितकर यांच्यासह श्रीनिवास सौदागर, मयुरेश सौदागर, विठ्ठल करंगुटकर, महेश खानोलकर, सत्यवान पेडणेकर, रमण किनळेकर, अमृत काणेकर, किरात साप्ताहिकाचे सुनिल मराठे, प्रथमेश गुरव, मळगांव ग्रंथालयाचे आणि रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिराचे पदाधिकारी तसेच अंगणवाडी व बालवाडी ताई, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार कार्यकारिणी सदस्य महेश बोवलेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!