सुंदरभाटले येथे गणेश जयंतीनिमित्त कार्यक्रम

सुंदरभाटले येथे गणेश जयंतीनिमित्त कार्यक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*सुंदरभाटले येथे गणेश जयंतीनिमित्त कार्यक्रम*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

वेंगुर्ला-सुंदरभाटले येथे माघी गणेश जयंती निमित्त गणपती प्रतिष्ठापना, पूजा तसेच दशावतारी नाटकांचे आयोजन केले आहे.  दि. 22 जानेवारी रोजी गणपतीची प्रतिष्ठापना, पूजन, आरती, सायंकाळी भजन, दि.23 रोजी सायं.7.30 वा. आजगांवकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा ‘नारायणी महाकाले·श्वर’ हा नाट्यप्रयोग, दि. 26 रोजी श्रीसत्यनारायण महापूजा, दि. 27 रोजी सायं.7.30 वा. श्री स्वामी माऊली पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, डोंगरपाल यांचा ‘मूषक दैत्य’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. दि.28 रोजी सायंकाळनंतर
मानसी पूल येथे गणपतीचे विसर्जन होणार आहे. यावेळी भाविकांनी उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा तसेच नाट्यप्रयोगांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव वांद्रे·श्वर प्रासादिक कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळातर्फे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!