वर्धापनदिन व माघी गणेश जयंती उत्सव

वर्धापनदिन व माघी गणेश जयंती उत्सव

*कोंकण एक्सप्रेस*

*वर्धापनदिन व माघी गणेश जयंती उत्सव*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

वेंगुर्ला तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या कॅम्प येथे असलेल्या श्री वरदविनायक मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेचा आणि शिखर कलशारोहणाचा प्रथम वर्धापनदिन तसेच दरवर्षीप्रमाणे माघी गणेश जयंती उत्सव संपन्न होणार आहे.

दि.20 रोजी श्री वरदविनायक मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेचा आणि शिखर कलशारोहणाचा प्रथम वर्धापनदिन असून यादिवशी सकाळी अभिषेक, धार्मिक विधी आणि सायंकाळी भजने. तर दि. 22 रोजी माघी गणेश जयंती उत्सव, यादिवशी सकाळी नित्यपूजा, त्यानंतर श्रीसत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, सायंकाळी संगीत व वारकरी भजने होणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ला तालुका सहकारी खरेदी विक्री संघ आणि स्थानिक रहिवाशांतर्फे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!