भुईबावडा परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस…5 जणांवर हल्ला

भुईबावडा परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस…5 जणांवर हल्ला

*कोंकण एक्सप्रेस*

*भुईबावडा परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस…5 जणांवर हल्ला*

*वैभववाडी (प्रतिनिधी)*

वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा भागातील अनेक गावात पिसाळलेल्या कुत्र्याने 5 जणांना चावून जखमी केले आहे मंगळवारी सकाळी 7 वाजल्यास 10.30 वाजेपर्यंत ऐणारी येथील जयंवती दत्ताराम पांचाळ, रघुनाथ भिकाजी मोहिते भुईबावडा संतोष बापू शेळके, परशुराम राठोड तिरवडे येथील राजेंद्र रमेश पाथरे या सर्वावर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर अजून एक जाणला चावला असून उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहे तसेच या गावातील कुत्र्यांना ही चावला आहे यामुळे भुईबावडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र येथील जागृत ग्रामस्थांनी सुरक्षेच्या कारणास्तव पिसाळलेल्या कुत्र्याला मारण्यात आले असल्याचे समजते काही वयोवृद्ध महिला, तरुण अशा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!