*कोंकण एक्सप्रेस*
*” सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय जागतिक महिला दिना निमित्त महिला मॅरेथॉन स्पर्धा २०२६ ” व गुणवंत महिला क्रीडा सन्मान सोहळा*
* कणकवली : सौ संजना हळदिवे*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील तळेरे गावात प्रथमच जिल्ह्यातील जेष्ठ महिला, महिला – मुलीच्या अथलेटिक्स, मॅरेथॉन या क्रीडा प्रकारात विकास व्हावा या करिता श्री फोँडकन देवी स्पोर्ट्स अकॅडमी, निरोम च्या वतीने व सिंधुदुर्ग जिल्हा मास्टर्स अथलेटिक्स असोसिएशन, सिंधुदुर्ग च्या संलग्नते नी व वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे ता. कणकवली,जि.सिंधुदुर्ग यांच्या सहकार्यनी आयोजित ” सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय जागतिक महिला दिना निमित्त महिला मॅरेथॉन स्पर्धा ” व गुणवंत महिला क्रीडा सन्मान सोहळा. दि.८ मार्च २०२६ रोजी सकाळी ७.०० उपस्थिती स्पर्धा सुरु सकाळी.७.३० वाजे पर्यंत
स्पर्धा स्थळ वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे ,ता. कणकवली,जि.सिंधुदुर्ग मध्ये घेण्यात येतील. मॅरेथॉन स्पर्धा वयोगट : १०- १ की. मी. / १२ वर्षा खालील -२ की. मी. /१४ वर्षा खालील -३km/१७ वर्षा खलाली -३km वर्षाखालील मुली / खुला गट महिला-५ km व ४५ वर्षावरील महिला – ५km गटा मध्ये
स्पर्धेत सहभाग घेता येईल. मॅरेथॉन स्पर्धा शुल्क रु.३००/- (१०/१२/१४/१७ वर्षाखालील मुली ) शुल्क रु. ५००/- , खुला गट महिला व ४५ वर्षावरील महिला या गटा ला आकारण्यांईल.सर्व विजयी तीन स्पर्धाकांना चषक व प्रविण्या प्रमाणपत्र देण्यात येतील तसेच उत्कृष्ट संघ ला पारितोषिक व सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.या स्पर्धेत साठी कु. स्वप्नाली बेनकर, आरती देशमुख, माधुरी खराडे,कु. हर्षदा बोडेकर, प्राची लाड, सुजाता हरणे, अंजली गायकवाड, सायली शेळके, कु. अवनी प्रमोद घाडीगावकर कु. प्रचिती प्रमोद घाडीगावकर व अनेक नामवंत जिल्हा,राज्य, राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय खेळाडू यात सहभागी होणार आहेत व क्रीडा तज्ञ,पंच यांच्या मार्गदर्शना खालील करणार आहेत.या स्पर्धे साठी नावे नोंदणी करण्यात यावे . तरी जिल्ह्यातील सर्व शालेय, महाविद्यालयातील व गावातील महिला,मुलींना यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावं से अहवान संस्थेचे अध्यक्ष/ संस्थापक .श्री. समीर ज. राऊत व सचिव.सौ. सुवर्ण अभिजित जोशी यांनी केली आहे.हे क्रीडा स्पर्धेत महिला – मुलींना सुदृडते साठी व एकच ध्यास सिंधुदुर्ग क्रीडा विकास .तरी अधिक माहिती व प्रवेश अर्ज मिळण्यासाठी ठिकाण संपर्क – श्री रुपेश वाळके एस टी बुक स्टॉल, कणकवली एस टी स्टॅन्ड, कणकवली, जि. सिंधुदुर्ग, व संपर्क – श्री. समीर राऊत- ७९००१९७४७५ / ८९२८८८३५९४, श्री. डॉ. प्रमोद घाडीगावकर, श्री. नवलसिंग तडवी (क्रीडा शिक्षक ), श्री. बाळकृष्ण कदम ( स्पर्धा पंच अधिकारी ) संपर्क साधावा.
मॅरेथॉन स्पर्धा शुल्क जि. पे द्वारे करावी जी पे क्र. 8928883594 भरावी.नोंदणी सुरु करण्यात आली आहे.तसेच स्पर्धा नोंदणी ची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आहे. याची नोंद घ्यावी.

