*कोंकण एक्सप्रेस*
*वराडकर हायस्कूल कट्टा येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा मेळावा उत्साहात संपन्न*
*मालवण : प्रतिनिधी*
शतक महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संयुक्त कट्टाच्या १९८१- ८२ च्या माजी विद्यार्थ्यांनी “या चिमण्यांनो परत फिरा घराकडे आपुल्या”या आवाहनास प्रतिसाद देत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (सं) कट्टा च्या १९८१- ८२ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा प्रशालेच्या सिद्धिविनायक सभागृहात उत्साहात संपन्न झाला.
या वेळी माजी विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत केले यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पंचारतीने ओवाळून औक्षण केले यावेळी ढोल ताशा लेझीम आणि एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी परेड , फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषी स्वागत केले.
यावेळी कै.डॉ.काकासाहेब वराडकर यांच्या पुतळ्यास माजी विद्यार्थिनी सौ लिला वाईरकर आणि विजया शहाणे यांनी पुष्पहार अर्पण केला तसेच श्री उदय वांगणकर यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात केली. या मेळाव्यास देश विदेशातून, उच्च पदस्थ अधिकारी व्यासायिक,उद्योजक,नोकरदार,
यशस्वी आधुनिक शेतकरी, तंत्रज्ञ वर्गातून सुमारे 69 माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस दिवंगत
सर्व शिक्षक आणि विद्यार्थी बंधू भगिनी आणि कर्मचारी यांना दोन मिनिट स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
मेळाव्याचे उद्घाटन प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती वासंती किणीकर मॅडम यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री बी एस आकेरकर,
श्री एस व्हि.तांबीटकर सर,
श्री बी एस काळे सर श्री बी टी माने सर,श्री. बापट सर, श्री एस डी. गावडे सर, श्री.जे बी सामंत सर, म्हाडगूत सर ,तसेच वझे मॅडम, महादेव वाईरकर मामा, तुकाराम जांभवडेकर मामा उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर सचिव श्री सुनील नाईक , स्कूल कमिटी चेअरमन सुधीर वराडकर उपस्थित होते
तसेच कै.योगात्मा डॉ.काकासाहेब वराडकर यांच्या प्रतिमेस माजी विद्यार्थी श्री संजय पार्टे, विद्येची देवता सरस्वती देवी विद्यमान मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे मॅडम, तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माजी विद्यार्थी सौ. मंगल कदम यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले.
यावेळी शाळेची माजी विद्यार्थिनी सौ विजया शहाणे यांनी म्हटलेली प्रार्थना आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या स्वागत गीताने वातावरण मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेच्या माध्यमातून स्मिता कॉम्प्युटरच्या संचालिका व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी सौ. लीला वाईरकर यांनी शाळेत घेण्यात आलेल्या मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. ज्या शाळेने आपल्याला घडविले ज्या शिक्षकानी आपल्याला ताठ मानेने, अभिमानाने समाजात जगायला शिकविले त्या शिक्षकांच्या प्रति असलेला भाव जपण्यासाठी, तसेच कितीही मोठे झालात तरी आपल्या शाळेला विसरू नका असे आवाहन केले. माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी घेण्यात आलेली मेहनत, दोन महिन्यापासून चे माजी विद्यार्थी यांच्याइ संपर्कासाठीचे प्रयत्न, या कार्यात येणाऱ्या अडचणी याविषयी मनोगत व्यक्त करताना झालेली कसरत व त्या माध्यमातून एकत्र जमलेल्या विद्यार्थ्यांना भावनिक साद घातली. व यासाठी आपली मैत्रीण विजया शहाणे व त्यांचे पती तसेच श्री सुनील नाईक यांनी दिलेली खंबीर साथ आणि त्याचबरोबर मित्र-मैत्रिणीच्या माध्यमातून झालेल्या या सोहळ्याबद्दल समाधान व्यक्त करताना शालेय आठवणी व शाळेबद्दलचे मनोगत व्यक्त करताना प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवी सहकार्याबद्दल मदतीचे आवाहन केले. तसेच उपस्थित गुरुजनांच्या बद्दल आदर व्यक्त करून आपल्या शालेय आठवणी जागृत केल्या.
यावेळी संतोष चव्हाण (मुख्याध्यापक इंग्लिश मीडियम स्कूल, पनवेल) यांनी शाळेच्या आठवणी जागृत करताना गुरूंच्या विषयीचे महत्त्व विशद केले व याचबरोबर कै. डॉ. काकासाहेब वराडकर यांच्याविषयी च्या
कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमाचे निमित्ताने कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर यांनी माजी विद्यार्थ्यांच्या बद्दल गौरवोद्गार काढताना शाळेचे माजी विद्यार्थी शाळेचे वैभव असून शाळेच्या उत्कर्षासाठी त्यांनी केलेले उपक्रम व त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त. करुन सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले.
संस्थेचे सचिव श्री सुनिल नाईक यांनी शतक महोत्सवी निमित्ताने शाळेच्या विस्तारीकरणाचे काम संस्थेने हाती घेतलेले आहे या सर्व कामासाठी अंदाजे एक कोटी 27 लाख रुपयाचा खर्च असून शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी रुपये दोन हजार प्रत्येकी देऊन असा कृतज्ञता निधी जमा करावा असे आवाहन करताना या नियोजित इमारतीसाठी शाळेचे माजी विद्यार्थी श्री चित्तरंजन व चित्रा जठार या उभयतानी आपल्या मुंबईतील एका फ्लॅटची 75 टक्के रक्कम माझ्या शाळेला देण्यात यावी असे इच्छापत्रात लिहून ठेवले होते त्याप्रमाणे 51 लाख 90 हजार रुपये संस्थेकडे जमा होत आहेत त्यात माजी विद्यार्थी 81..82 च्या बॅच ने 2,02026 चा दिलेला कृतज्ञता निधी इतर माजी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरवून संस्थेचा व शाळेचा उत्साह वाढवणारा आहे असेच सहकार्य माजी विद्यार्थ्याकडून मिळेल अशी सदिच्छा व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या वेळी सर्व माजी गुरुजनांना शाल श्रीफळ आणि गुणविशेष, वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख असलेले सन्मानपत्र देऊन सन्मानित केले ही सन्मानपत्रे माजी विद्यार्थिनी सौ विजया शहाणे यांनी सुस्पष्ट अशा आवाजात वाचून ती गुरुवर्यांना समर्पित केली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून माजी विद्यार्थ्यानी सुवर्ण वर्षाची आठवण म्हणून “दोन लाख दोन हजार सव्वीस “ही रक्कम प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे यांच्याकडे सुपूर्द केली तदनंतर सदर रक्कम कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष श्री अजयराज वराडकर व सचिव श्री सुनील नाईक यांच्याकडे मुख्याध्यापिकां यांनी सोपवली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी विद्यार्थी यांना गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांना मंगल्याचे प्रतीक म्हणून सुपारीचे रोप देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी संजय पार्टे आणि संतोष चव्हाण यांनी प्रत्येक उपस्थित माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी भगिनीस या मेळ्यात मेळाव्याची आठवण म्हणून सन्मानचिन्ह प्रदान केली.
प्रशालेच्या परिसरात राष्ट्रीय छात्र सेनेच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांना दिलेली मानवंदना तसेच विद्यार्थ्यांनी केलेले पुष्प वृष्टी, लेझीम पथक यामुळे माजी विद्यार्थ्यांच्या मनात शाळेविषयीच्या जुन्या आठवणी जागृत झाल्या त्याचबरोबर मान्यवरांना बांधलेले फेटे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. माजी विद्यार्थी व माजी शिक्षक ४३ वर्षानंतर पुन्हा भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ये “दोस्ती कभी नही टूटेगी” या गाण्याने माजी विद्यार्थ्यांनी धरलेला ठेका तर लक्षवेधी ठरला. खेळीमेळीच्या वातावरणात व भावनिक आठवणीने नटलेला हा मेळावा उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संयुक्त कट्टा वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा डॉक्टर दादासाहेब कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा चे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेत तर कर्मचारी, हितचिंतक विद्यार्थी, पालक, उपस्थित होते. प्रशालेतील झालेला माजी विद्यार्थी स्नेह मेळावा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरून चर्चेचा विषय ठरला. यावेळी आकर्षक रांगोळी काढली होती.
सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी सौ विद्या नाचवणेकर आणि मंगल कदम यांनी केलं तर आभार प्रदर्शन माजी विद्यार्थिनी सौ लीला वाईरकर यांनी केलं

