आमदार मा. श्री. निलेश राणे साहेब व उपनेते श्री. संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. सदानंद हळदीवे यांचा शिवसेना प्रवेश

आमदार मा. श्री. निलेश राणे साहेब व उपनेते श्री. संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. सदानंद हळदीवे यांचा शिवसेना प्रवेश

*कोंकण एक्सप्रेस*

*आमदार मा. श्री. निलेश राणे साहेब व उपनेते श्री. संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. सदानंद हळदीवे यांचा शिवसेना प्रवेश*

*फोंडाघाट जि.प. मतदारसंघातून उमेदवारी जाहीर…*

*कणकवली : सौ. संजना हळदिवे*

कणकवली पं. समितीचे माजी उप सभापती श्री. सदानंद गोविंद हळदीवे (बबन उर्फ मामा हळदीवे ) यांचा आज शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत पक्षप्रवेश झाला. मालवण नीलरत्न बंगल्यावर झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास कुडाळ–मालवणचे आमदार मा. श्री. निलेश राणे साहेब व शिवसेना उपनेते श्री. संजय आग्रे व जिल्हा प्रमुख श्री. दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी श्री. हळदीवे यांना फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महायुतीमार्फत ए बी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली तसेच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. दत्ता सामंत, विधानसभा प्रमुख श्री. संदेश पटेल, तालुका प्रमुख श्री. मंगेश गुरव व श्री. शरद वायगंणकर, देवगड तालुका प्रमुख श्री. अमोल लोके, श्री. विलास साळसकर, श्री. दीपक पाटकर, उपजिल्हाप्रमुख श्री. हरेश पाटील, श्री. राजन नानचे. श्री. मिथिल सावंत यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेची लोकाभिमुख धोरणे, विकासाभिमुख नेतृत्व तसेच मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन श्री. हळदीवे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यांच्या प्रवेशामुळे कणकवली तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!