कणकवलीत निवडणुकीची रणधुमाळी सुरू; पहिल्या टप्प्यात ४ उमेदवारी अर्ज दाखल

कणकवलीत निवडणुकीची रणधुमाळी सुरू; पहिल्या टप्प्यात ४ उमेदवारी अर्ज दाखल

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवलीत निवडणुकीची रणधुमाळी सुरू; पहिल्या टप्प्यात ४ उमेदवारी अर्ज दाखल*

*​कणकवली ः संजना हळदिवे*

कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, आतापर्यंत विविध पक्षांच्या वतीने एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी ही माहिती दिली.
​कोणी कुठे भरला अर्ज? तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गट आणि १६ पंचायत समिती गणांसाठी निवडणूक होत आहे. आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
​कलमठ जिल्हा परिषद गट: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून वैदेही विलास गुडेकर यांनी आपले दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
​फोंडाघाट जिल्हा परिषद गट: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) तर्फे अनंत पिळणकर यांनी एक अर्ज दाखल केला आहे.
​हरकुळ बुद्रुक पंचायत समिती गण: भारतीय जनता पक्षातर्फे (भाजप) सायली संजय तोरसकर यांनी डमी उमेदवार म्हणून आपला अर्ज सादर केला आहे.
​उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे आणि इतर कर्मचारी कार्यरत आहेत. विविध जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली असून, तिथे अर्जांची काटेकोर तपासणी केली जात आहे.
​शेवटच्या दिवशी गर्दीची शक्यता
​सध्या केवळ ४ अर्ज प्राप्त झाले असले तरी, राजकीय गोटात हालचालींना वेग आला आहे. अपेक्षेप्रमाणे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!