*कोंकण एक्सप्रेस*
*सोनू सावंत वरवडे पं. स. मतदारसंघातून भाजपचे अधिकृत उमेदवार; उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज*
*कणकवली ः संजना हळदिवे*
कणकवली तालुक्यातील वरवडे पंचायत समिती सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने राजेश उर्फ सोनू सावंत यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
एबी फॉर्मचे वाटप
भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या हस्ते सोनू सावंत यांना पक्षाचा अधिकृत ‘एबी’ फॉर्म सुपूर्द करण्यात आला. या निवडीमुळे वरवडे मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याप्रसंगी मिलिंद मेस्त्री, महेश गुरव यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२१ जानेवारीला शक्तीप्रदर्शन
सोनू सावंत हे बुधवारी, २१ जानेवारी रोजी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करणार आहेत. अर्ज भरताना भाजप आणि महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून मोठे शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे

