कणकवलीत राजकीय घडामोडींना वेग: माजी उपसभापती बबन (मामा) हळदिवे यांचा शिवसेनेत प्रवेश

कणकवलीत राजकीय घडामोडींना वेग: माजी उपसभापती बबन (मामा) हळदिवे यांचा शिवसेनेत प्रवेश

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवलीत राजकीय घडामोडींना वेग: माजी उपसभापती बबन (मामा) हळदिवे यांचा शिवसेनेत प्रवेश*

*​फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता; राजकीय समीकरणे बदलणार*

*कणकवली ः संजना हळदिवे*

कणकवली तालुक्यातील फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले माजी उपसभापती बबन उर्फ मामा हळदिवे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अधिकृतपणे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे असून फोंडाघाट मतदारसंघावर शिवसेनेने आपला दावा प्रबळ केला आहे.
​आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार राणे यांनी हळदिवे यांचे पक्षात स्वागत करत, त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्ष संघटनेला होईल असा विश्वास व्यक्त केला.
​फोंडाघाटच्या उमेदवारीबाबत चर्चा
​बबन हळदिवे यांच्या पक्षप्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत फोंडाघाट मतदार संघाची उमेदवारी शिंदे शिवसेनेकडे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या मतदार संघात हळदिवे यांचा मोठा जनसंपर्क असल्याने शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
​यावेळी उपस्थित मान्यवर:
या सोहळ्याप्रसंगी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, महेश कांदळकर, शरद वायंगणकर, सत्यवान राणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!