*कोंकण एक्सप्रेस*
*को-याचीवाडी येथे नविन ट्रान्सफार्मरचे भूमीपूजन पपू परब यांचे हस्ते*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
दाभोली – को-याचीवाडी येथे नविन ट्रान्सफार्मरचे भूमीपूजन वेंगुर्ला तालुका भाजपाचे अध्यक्ष पपू परब यांचे हस्ते करण्यात आले. या कामी पालकमंत्री नितेश राणे, अॅड.दशरथ जाधव, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांचे सहकार्य लाभले.
यावेळी दाभोली आणि खानोली गावचे सरपंच तसेच श्रीकांत चेंदवणकर, विवेक जोशी, काका बांदवलकर, दशरथ चेंदवणकर, उमेश जोशी, सुधाकर बांदवलकर, दिगंबर खानोलकर, अनिकेत कांबळी, सुभाष जोशी, यतिन आवळेगांवकर, अमेय जोशी आदी उपस्थित होते. ट्रान्सफार्मरसाठी जमिन देणारे जमिन मालक विवेक जोशी व उमेश जोशी यांचा पपू परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार अण्णा जोशी यांनी मानले.

