*कोंकण एक्सप्रेस*
*नवाबाग येथे माघी गणेश जयंती उत्सव*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
नवाबाग ग्रामस्थांतर्फे बायुला घुमटे·श्वर मंदिर येथे माघी गणेश जयंती उत्सव साजरा होणार आहे. दि.22 जानेवारी रोजी जल्लोषात मिरवणूकीने गणरायाचे आगमन, पूजन, दु.12 वा. आरती व
तीर्थप्रसाद, सायं.5 वा. रामेश्वर महिला वारकरी मंडळाचे (वेंगुर्ला) भजन, सायं.6 वा. नवाबाग ग्रामस्थांची संगीत आरती, सायं. 7 वा. कुडाळ येथील भैरव जोगेश्वरी महिला मंडळाचे फुगडी नृत्य, रात्रौ 8.30 वा.लकी ड्रॉ कुपन स्पर्धा, रात्रौ 9.30 वा.नटराज प्रॉडक्शन प्रस्तुत, विश्व कलामंच निर्मित नृत्य, हास्य, विनोदांचा कलाविष्कार, दि.23 रोजी पहाटे 5 वा. काकड आरती, पूजन, स. 10 वा.नवाबाग ग्रामस्थांचे वारकरी भजन, दुपारी 12.30 वा.महाप्रसाद, दु. 3 वा. स्थानिक महिलांची फुगडी व हळदीकुंकू समारंभ, सायं. 6 वा. गणपती विसर्जन असे कार्यक्रम होणार असून भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. तसेच फक्त 20 रूपयांत भव्य लकी ड्रॉ कुपन स्पर्धा ठेवण्यात आली असून यातील आकर्षक भरघोस बक्षिसे जिंकण्यासाठी जास्तीत जास्त कुपन खरेदी करावीत, असे आवाहन नवाबाग ग्रामस्थांनी केले आहे. लकी ड्रॉ कुपन हितेश तांडेल (7249269076), देवेंद्र केळुसकर (9764234728), कपिल टाककर (7773977336) व भूषण मसुरकर (9420178825) यांच्याकडे उपलब्ध आहेत.

