नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा केला सत्कार

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा केला सत्कार

*कोंकण एक्सप्रेस*

*कनकनगर येथील महापुरुष मंदिरात ब्राम्हण भोजन समारंभ संपन्न*

*नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा केला सत्कार*

*प्रभागातील अनेक वर्षे प्रलंबित असलेली कामे मार्गी लावणार – संदेश पारकर*

*कनकनगर वासियांमुळेच उपनगराध्यक्ष पदाचा मान मिळाला – सुशांत नाईक*

*कणकवली – प्रतिनिधी*

कनकनगर येथील श्री महापुरुष मंदिरात प्रतीवर्षी प्रमाणे ब्राम्हण भोजन समारंभ संपन्न झाले. यनिमित्त सकाळी विधीवत पूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, रात्री सुस्वर भजने असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी कनकनगर वासियांच्या वतीने नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, गटनेते रुपेश नार्वेकर, नगरसेवक जयेश धुमाळे, संकेत नाईक, बाळू पारकर, जाई मुरकर यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कनकनगर वासियांचे आभार मानले, प्रभागाच्या विकासासाठी नेहमी कार्यतत्पर राहणार, मूलभूत सोयी सुविधा या येत्या पाच वर्षात देण्याचा प्रयन्त करणार. प्रभात गेली अनेक वर्षे काही कामे प्रलंबित आहेत ती कामे तुमच्या सहकार्यातून लवकरच मार्गी लावणार, असा विश्वास यावेळी पारकर यांनी दिला.
उपनगराध्यक्ष सुशांत नाईक म्हणाले, प्रथमता सर्व कनकनगर वासियांचे मी आभार मानतो तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे व पाठिंब्यामुळे उपनगराध्यक्ष पदाचा मान मिळाला. कनकनगर च्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार व येत्या काळात तुमच्या तुमच्या सर्वांच्या सहकार्याने कनकनगर प्रभागातील प्रलंबित प्रश्न आपण मार्गी लावू असा ठाम विश्वास यावेळी नाईक यांनी दिला.
यावेळी कनकनगर येथील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!