जनतेशी नाळ जोडलेला उमेदवार; संजय गवस चर्चेत..

जनतेशी नाळ जोडलेला उमेदवार; संजय गवस चर्चेत..

*कोंकण एक्सप्रेस*

*जनतेशी नाळ जोडलेला उमेदवार; संजय गवस चर्चेत…*

*दोडामार्ग.. शुभम गवस*

माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सिंधुदुर्ग न्यूजशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली.
पिकुळे गावचे रहिवासी असलेले संजय गवस हे अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत प्रशासन व सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. स्थानिक प्रश्नांची जाण, प्रशासकीय अनुभव आणि जनतेशी असलेला थेट संपर्क ही त्यांची बलस्थाने मानली जात आहेत.
माटणे मतदारसंघात आजही मूलभूत सुविधा, पायाभूत विकास व रोजगाराचा अभाव जाणवत आहे. स्थानिकांना रोजगारासाठी गोव्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे गवस यांनी स्पष्ट केले.
अनुभव, स्थानिक नेतृत्व आणि विकासाची स्पष्ट भूमिका यामुळे माटणे जिल्हा परिषद निवडणुकीत संजय गवस यांची उमेदवारी निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!