*कुडाळ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून ; मात्र पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही*

*कुडाळ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून ; मात्र पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही*

*कोंकण एक्सप्रेस*

*कुडाळ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून ; मात्र पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
जि.प. आणि पं.स.निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुट्टीचे दिवस वगळून बुधवार, दि. २१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
तहसीलदार कार्यालयातून जिल्हा परिषदेसाठी ५ व पंचायत समितीसाठी ९ अशा एकूण १४ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली आहे. यात माणगाव जि.प. – सदाशिव परशुराम आळवे (अपक्ष), ओरोस बुद्रुक – रामदास गोपाळ ठाकूर (अपक्ष), नेरूर देऊळवाडा – बाळकृष्ण गुरूनाथ पावसकर (अपक्ष), पावशी – मंदार सखाराम कोठावळे (अपक्ष) व वेताळबांबर्डे – अनंतराज नंदकिशोर पाटकर ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) यांनी अर्ज विकत घेतले.
झाराप पं.स. – सदाशिव आळवे ( अपक्ष), पिंगुळी – कश्मिरा केतन शिरोडकर यांच्यासाठी केतन विजय शिरोडकर (अपक्ष), डिगस – विनायक जनार्दन अणावकर (शिंदे शिवसेना), डिगस – विनायक जनार्दन अणावकर (अपक्ष), कसाल – चंद्रकांत अनंत राणे (शिंदे शिवसेना – २ अर्ज), आंब्रड – अंकित विनायक नार्वेकर (शिंदे शिवसेना), डिगस – मंदार सखाराम कोठावळे (अपक्ष), ओरोस बुद्रुक – अनंतराज नंदकिशोर पाटकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) यांनी तहसीलदार कार्यालय येथून उमेदवारी अर्ज विकत घेतल्याची माहीती तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील, नायब तहसीलदार संजय गवस व निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!