कुवळे विद्यामंदिरचे २० ला स्नेहसंमेलन

कुवळे विद्यामंदिरचे २० ला स्नेहसंमेलन

*कोंकण एक्सप्रेस*

*कुवळे विद्यामंदिरचे २० ला स्नेहसंमेलन*

*शिरगाव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कुवळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संस्था पदाधिकारी, शाळा समिती पदाधिकारी, पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २० जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यात सकाळी ८.३० वाजता फनी गेम्स, ९.३० वाजता अल्पोपहार, १० वाजता पोस्टर, चित्रकला, स्टोन आर्ट, टाकाऊपासून टिकाऊ आदी प्रदर्शनाचे उद्घाटन, १०.३० वाजता वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, रात्री ७वाजता विद्यार्थी विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमांना संस्था पदाधिकारी, संचालक, सभासद, हितचिंतक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशालेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!