*कोकण Express*
*वेंगुर्ले शहरात उद्यापासून जनता कर्फ्यु…*
*अत्यावश्यक सेवा दुपारी १ वाजेपर्यंत सुरू*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
कोरोना पाश्वभूमीवर शहरात उद्यापासून कडक निर्बध लावण्यात येत आहे त्यात सकाळी ७:३० ते दुपारी १ पर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. त्यानंतर शहरात कडक जनता कर्फ्यु असेल. अत्यावश्यक सेवासहित सर्व आस्थापने बंद राहतील फक्त त्यात पार्सल सेवा सुरू राहील अशी माहिती मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांनी दिली.
आज सकाळी तहसील कार्यालयात तातडीची बैठक संपन्न झाली या बैठकीत तहसीलदार प्रवीण लोकरे, नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी डॉ अमितकुमार सोंडगे,पोलीस निरीक्षक तानाजी मोरे, गटविकास अधिकारी उमा पाटील, ता वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. मणचेकर यांच्यासाहित इतर अधिकारी उपस्थित होते.