*कोंकण एक्सप्रेस*
*महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची रत्नागिरी केळशी पाजपंढरी मार्गे पुर्ववत बससेवा सुरु करण्याचे निर्देश*
*ग्रामपंचायत पाजपंढरी,सामाजिक कार्यकर्ते वैभव बहुतूले यांच्या पाठपुराव्याला यश*
*दापोली*
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची रत्नागिरी दापोली केळशी ही बस गेली कित्येक महिने बायपास मार्गे चालवली जाणारी एसटी बससेवा आत्ता हर्णे व पाजपंढरी मार्गे चालवल्याने एसटी प्रवासी वर्गाचा त्रास कमी होणार आहे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची रत्नागिरी दापोली केळशी ही बस गेली कित्येक महिने बायपास मार्गे चालवली जात होती.हर्णे व पाजपंढरी प्रवासी वर्गानी रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी संस्थेचे रेल्वे अभ्यासक श्री.वैभव बहुतूले यांच्याकडे आपल्या तक्रारीवरून प्रादेशिक कार्यालयाचे महाव्यवस्थापक वाहतूक श्री.नितीन मैंद,उप महाव्यवस्थापक कोकण विभागाच्या माजी आर एम यामिनी जोशी नवनियुक्त आर एम चेतना किरवाडकर यांच्याकडे सततच्या पाठपुराव्याने दि.१ जानेवारी २६ पासून हर्णे व पाजपंढरी मार्गे पुर्ववत करण्याचे निर्देश तसेच हर्णे व पाजपंढरी संगणकीय आरक्षण बंद करण्यात आरक्षण सुरु करण्याचे आदेश विभागीय नियंत्रक रत्नागिरी श्री.प्रज्ञेष बोरसे,विभागीय वाहतूक नियंत्रक रत्नागिरी प्रमोद यादव व आगार व्यवस्थापक श्री.पाटील यांना देण्यात आलेले आहे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी दापोली पाजपंढरी केळशी संगणकीय आरक्षण करुन प्रवास करावा जेणेकरून प्रवासी संख्येत वाढ होऊन एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होईल

