*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला येथे शिशू / बाल आनंद मेळावा*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग या संस्थेच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त आधार फाऊंडेशन, आधार कन्सल्टसी आणि फायनान्शियल सÐव्हसेस, सिंधुदुर्ग आयोजित व वेंगुर्ला गॅस सÐव्हस पुरस्कृत गुरूवार दि. 15 जानेवारी रोजी दुपारी 3 ते 7 या वेळेत नगरवाचनालय, वेंगुर्ला येथे शिशू / बाल आनंद मेळावा आयोजित केला आहे.
6 ते 11 महिने वयोगटासाठी रांगण्याची स्पर्धा (30 फुट, वेळ 10 मिनिट), 3 वर्षाखालील तसेच 3 वर्षावरील ते 6 वर्षाखालील गटासाठी वेशभूषा स्पर्धा (वेळ 2 मिनिट), 6 वर्षावरील ते 8 वर्षाखालील गटासाठी कविता पाठांतर स्पर्धा (वेळ 3 मिनिट), 8 वर्षावरील ते 10 ते वर्षाखालील गटासाठी मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा (वेळ 3 मिनिट)चे आयोजन केले आहे. स्पर्धकांनी आपले नावे 14 जानेवारीपर्यंत सायंकाळी 4 वाजेपर्यंत वेंगुर्ला गॅस सÐव्हस येथे द्यावीत. प्रत्येक स्पर्धकाने सोबता येताना जन्म दाखला किंवा आधार कार्ड घेऊन येणे अनिर्वाय आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 9422434356 यावर संपर्क साधावा. जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी घ्यावा असे आवाहन आधार फाऊंडेशनच्यावतीने अध्यक्ष माधुरी वेंगुर्लेकर आणि सचिव अॅड.नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

