दोडामार्गातील आंबेली मार्गावर दुचाकी अपघात

दोडामार्गातील आंबेली मार्गावर दुचाकी अपघात

*कोंकण एक्सप्रेस*

*दोडामार्गातील आंबेली मार्गावर दुचाकी अपघात..*

*समोरासमोर धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान; मोठी दुर्घटना टळली*

*दोडामार्ग : शुभम गवस*

आंबेली–कोनाळकरवाडी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून अपघात घडला. या अपघातात दोन्ही दुचाकींच्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे. अपघाताची तीव्रता पाहता गंभीर परिणाम होण्याची शक्यता होती; मात्र सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही तसेच जीवितहानी टळली आहे.
अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक मंदावली होती. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले तसेच रस्त्यावरची वाहतूक सुरळीत केली. संबंधित यंत्रणांनीही परिस्थितीची पाहणी केली आहे. या मार्गावर वळणदार रस्ता व वाहतुकीची वर्दळ अधिक असल्याने वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळून सावधगिरीने वाहन चालवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!