रत्नागिरीत २२ जानेवारी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा भक्ती उत्सव

रत्नागिरीत २२ जानेवारी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा भक्ती उत्सव

*कोंकण एक्सप्रेस*

*रत्नागिरीत २२ जानेवारी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा भक्ती उत्सव*

*कोकणातील नागरिकांना आली संधी ; सुदर्शन क्रियेतून मनशांतीतून तणाव मुक्तीचा मार्ग*

*कणकवली ः संजना हळदिवे*

महाराष्ट्रातील कोकणमधील रत्नागिरी जिल्ह्यात २२ जानेवारी २०२६ रोजी जागतिक शांततेचे दूत गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा भक्ती उत्सव कार्यक्रम होणार आहे. या भक्ती उत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री श्री रविशंकर सुदर्शन क्रियेतून मनशांतीतून तणाव मुक्तीचा मार्ग यावर कोकणभूमीला पुन्हा एकदा अध्यात्मिक ऊर्जेचा स्पर्श लाभणार आहेत.तरी या भक्ती उत्सव कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे प्रशिक्षक उमेश वायंगणकर यांनी केले आहे.

जागतिक शांततेचे दूत गुरुदेव श्री श्री रविशंकर हे प्राणायाम, ध्यान, योग आणि भारतीय संस्कृतीच्या अमूल्य मूल्यांचा जागतिक स्तरावर प्रसार करत आहेत. अनेक देशांमध्ये जावून गुरुदेव श्री श्री रविशंकर कोट्यावधी लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणत आहेत. सुदर्शन क्रिया या अनोख्या श्वसनतंत्राच्या वैद्यानिकदृष्ट्या यशस्वी तंत्राचा प्रसार त्यांनी तणावमुक्त जीवनाचा मार्ग दाखवण्यासाठी केला आहे. अनेक देशांतील संघर्ष, युद्धजन्य परिस्थितीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच,असंख्य रामभक्तांचे स्वप्न असलेल्या राम जन्मभूमीवरील राममंदिर उभारणीसारख्या राष्ट्रीय प्रश्नांमध्ये त्यांनी समन्वयाची भूमिका बजावली होती. रत्नागिरी सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभेल्या ही शहरात गुरुदेवांचे आगमन ही कोकणवासीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे उमेश वायंगणकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!