बी. एड. च्या स्नेहमेळाव्यात ‘ एम २, जी २ ‘ ची धमाल

बी. एड. च्या स्नेहमेळाव्यात ‘ एम २, जी २ ‘ ची धमाल

*कोंकण एक्सप्रेस*

*बी. एड. च्या स्नेहमेळाव्यात ‘ एम २, जी २ ‘ ची धमाल*

*बांद्यात आयोजन;मित्र मैत्रिणींच्या उत्साहाला उधाण- निसर्गरम्य वातावरणात सर्वांनी साजरा केला एक उनाड दिवस*

*देवगड : प्रतिनिधी*

शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड.) अभ्यासक्रमाच्या निमित्ताने देवगड येथील शां. कृ.पंतवालावलकर अध्यापक महाविद्यालयात एकत्र आलेल्या मित्र मैत्रिणींनी रविवार, दि.११ जानेवारी २०२६ रोजी सहावा स्नेहमेळावा म्युझिक,मस्ती, गप्पा आणि गाण्यांच्या (एम २ जी २) माध्यमातून साजरा केला.यावेळचा त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.सगळेजण अध्यापक महाविद्यालयात शिकत असलेल्या वयात पोचले होते. वय म्हणजे फक्त आकडे असतात,जगण्यातील आनंद शोधायचे असेल,तर लहान व्हा असाच जणू संदेश सर्वजण देत होते. ‘ एम २ जी २ ‘ हेच आनंदी जगण्यासाठीचे टॉनिक आहे ,हेच या गेट टुगेदरने दाखवून दिले.
बांदा सटमटवाडी येथील श्री रामभट स्वामी मठात गेट टुगेदर (स्नेहमेळावा) झाले.यावेळी
सदाशिव गवस , तारका सावंत,गीता सावंत,प्रभाकर धुरी , बाळू खानोलकर,शैलैंद्र आमणगी ,विजय देवदास , जनार्दन मराठे ,प्रमिला डायस , राजेंद्र पाटील , विजय गावकर ,चारूता काळे ,अनिल लोके ,दादा रेडकर ,अवधूत येनजी,संजय जोशी , संजय देसाई ,सुजाता धानजी , संतोष वायंगणकर ,संध्या वायंगणकर , दशरथ घाडी,जगदीश धोंड,धनंजय आंबेरकर , सुषमा जुवेकर,एन्.डी.पाटील,एस्.के.देसाई ,दिलीप काळे ,आनंदा जाधव ,भास्कर जडये ,प्रभा गवंडे ,राजन कर्पे ,राजदा कुबल ,अंकुश तावडे ,प्रकाश घाडी ,अभय मुणगेकर , दिनेश आजगावकर ,अलका वाळवेकर ,गीता जुवेकर,सरोज तोरसकर , गुरू कुसगावकर ,नाना मांजरेकर ,विलास देऊलकर ,वीणा पटवर्धन
,आर.एच.सावंत, चंद्रशेखर सातार्डेकर,लक्ष्मण आंबेरकर आदी उपस्थित होते.
मठाचे प्रमुख मानकरी बाबी वसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन ,तर शैलैंद्र आमणगी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला.वसकर यांनी श्री रामभट स्वामींचा महिमा सांगितला.यावेळी वीणा पटवर्धन,चारुता काळे,प्रभाकर धुरी यांनी कविता वाचन केले.दशरथ घाडी,संजय जोशी,प्रभाकर धुरी,अलका वाळवेकर,सुषमा जुवेकर,संध्या संतोष वायंगणकर, गुरु कुसगावकर ,राजेंद्र पाटील, दत्तप्रसाद खानोलकर, चारुता काळे यांनी वेगवेगळी गाणी सादर केली.जनार्दन मराठे यांनी बासरी वादन केले. बासरीवर वाजवलेले ‘, मीच खरा अपराधी ‘ हा अभंग लक्षवेधी ठरला.विजय गावकर यांनी यांनी हलकीफुलकी कथा सांगितली.हिंदी मराठी गाणी आणि अभंगाच्या स्वरांनी आसमंत नादमय झाला होता.ताल धरायला लावणाऱ्या संगीतावर मित्र मैत्रिणींची पावले न थिरकती तरच नवल! संगीताच्या तालावर सगळा ग्रुप नृत्यात सामील झाला आणि वातावरण जल्लोष,आनंद आणि समरसतेने भरून गेले.मित्र मैत्रिणींनी आणलेले गुलाब जाम,तिळाचे लाडू, बाकरवडी, म्हैसूर पाक ,कलिंगड ही सर्वांसाठी गोड मेजवानी ठरली.सायंकाळी केक कापून सहाव्या स्नेहमेळाव्याचा समारोप झाला.खऱ्या अर्थाने हा एक उनाड दिवस ठरला.
या स्नेहमेळाव्याचे आयोजन बांदा सर्वांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे ग्रुप लीडर सदाशिव गवस,दशरथ घाडी,भारत गावडे, जगदीश धोंड,संजय देसाई,शंकर देसाई आणि प्रभाकर धुरी यांनी केले होते.सूत्रसंचालन प्रभाकर धुरी यांनी केले.प्रास्ताविक दशरथ घाडी यांनी,तर सदाशिव गवस यांनी आभार मानले.
………

भावस्पर्शी मनोगत आणि बंगळुरूचे निमंत्रण

नाना मांजरेकर आणि प्रमिला डायस यांनी मनोगत व्यक्त केले.सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटल्याने आणि महाविद्यालयीन दिवस आठवल्याने त्यांना भरून आले.गदगदलेल्या स्वरांनी त्यांनी मनोगत व्यक्त केले.प्रमिला डायस यांनी पुढील स्नेहमेळावा बंगळुरू येथे आयोजित करावा, असा आग्रह धरला व आयोजनाची जबाबदारी स्वीकारली.त्यामुळे पुढचा स्नेहमेळावा बंगळुरू येथे घेण्याचे निश्चित झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!