“कोलझरची जमीन-जंगल वाचवण्यासाठी गाव एकवटले“कोलझरची जमीन-जंगल वाचवण्यासाठी गाव एकवटले

“कोलझरची जमीन-जंगल वाचवण्यासाठी गाव एकवटले“कोलझरची जमीन-जंगल वाचवण्यासाठी गाव एकवटले

*कोंकण एक्सप्रेस*

*“कोलझरची जमीन-जंगल वाचवण्यासाठी गाव एकवटले*

*दोडामार्ग / शुभम गवस*

इको-सेन्सिटिव्ह क्षेत्र असलेल्या कोलझर गावात बेकायदेशीर उत्खनन व वृक्षतोड झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ख्रिश्चनवाडी ते न्हयखोलदरम्यान रस्त्यासदृश उत्खनन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रविवारी झालेल्या ग्रामसभेत जमिनी न विकण्याचा निर्णय घेत ग्रामदैवतासमोर शपथ घेण्यात आली. या बैठकीस शामराव देसाई, आपा देसाई, गुरुदास देसाई, शरद देसाई, पी. पी. देसाई, दीपक देसाई, मुरारी मुंगी, सुदेश देसाई, उल्हास देसाई, महादेव देसाई, दिलीप देसाई, दौलत देसाई, राजाराम देसाई, आनंद देसाई, सत्यवान देसाई, अमर सावंत व देवेंद्र देसाई उपस्थित होते.
दरम्यान, महसूल विभागाने घटनास्थळी पाहणी सुरू केली असून दोषींवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!