*कोंकण एक्सप्रेस*
*जि. प., पं. स. निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेणार*
*सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश : आचारसंहिता लागण्याची शक्यता*
*कणकवली ः संजना हळदिवे*
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक लवकरच आचार संहिता लागण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली असून, त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे चित्र आता स्पष्ट झाले असून, राजकीय हालचालींना वेग येणार आहे. प्रत्येक पक्ष आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मोर्चेबांधणी करण्याची सुरुवात करत आहे.

