*कोकण Express*
*नगराध्यक्ष संजू परब यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस*
कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात फैलाव वाढत असतानाच कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगाने राबविली जात आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी देखील उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित राहत कोरोना प्रतिबंधक लस घेतली.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ . उत्तम पाटील, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर व अन्य सहकारी उपस्थित होते. आपण लस घेतली असून सावंतवाडी शहरातील अन्य नागरिकांनीही कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी असे आवाहन यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले.