आचिर्णे गावात विकासकामांचा धडाका ; आचिर्णे रेल्वे स्थानक जोडरस्त्याचे होणार डांबरीकरण

आचिर्णे गावात विकासकामांचा धडाका ; आचिर्णे रेल्वे स्थानक जोडरस्त्याचे होणार डांबरीकरण

*कोंकण एक्सप्रेस*

*आचिर्णे गावात विकासकामांचा धडाका ; आचिर्णे रेल्वे स्थानक जोडरस्त्याचे होणार डांबरीकरण*

*पालकमंत्री नितेश राणेंकडून 25 लाखांचा निधी*

*जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणेंच्या हस्ते झाले भूमिपूजन*

*वैभववाडी (प्रतिनिधी)*

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आचिर्णे गावासह दशक्रोशीत विविध विकासकामांचा धडाका सुरू आहे. तालुक्यातील आचिर्णे रेल्वेस्थानक जोडरस्त्याच्या डांबरीकरणसाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून या कामाचे भूमिपूजन सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक तथा माजी जि. प. सभापती दिलीप रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार आचिर्णे रेल्वे स्थानक जोडरस्ता डांबरीकरण मजबुतीकरणसाठी विकास निधी देण्याची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली होती. त्यानुसार पालकमंत्री नितेश राणे यांनी आमदार स्थानिक विकास निधीतून तब्बल 25 लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर केला होता. सदर कामाचे भूमिपूजन दिलीप रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आचिर्णे कडूवाडी रस्ता डांबरीकरण साठी जिल्हा वार्षिक योजना जनसुविधाअंतर्गत 5 लाख निधी पालकमंत्री नितेश राणे यांनी मंजूर केला होता. या विकासकामाचे लोकार्पण दिलीप रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री नितेश राणे यांनी आचिर्णे गावविकासासाठी दिलेल्या विकासनिधीबद्दल स्थानिकांतून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी वैभववाडी भाजपा
तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, सरपंच वासुदेव रावराणे, वैभववाडी नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, माजी पं. स.
सदस्य मंगेश लोके, संजय गांधी निराधार समिती सदस्य सिद्धेश उर्फ बंटी दिलीप रावराणे, भाजपा महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे, जयसिंग रावराणे, रितेश सुतार, उत्तम सुतार, रुपेश रावराणे, आदेश रावराणे, संजय सावंत, उमेश पवार, महेश चव्हाण, सुनील रावराणे, सुशील रावराणे, लवू पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!