*कोंकण एक्सप्रेस*
*असलदेत 13 जानेवारीला परब कुटुंबियांचा गोंधळ*
* रात्री १०.३० वा. २०-२० डबलबारी भजनाचा जंगी सामना*
*कणकवली : प्रतिनिधी*
असलदे मधलीवाडी येथे मंगळवार दि.१३ जानेवारी २०२६ रोजी परब कुटुंबियांच्यावतीने श्री भवानी मातेचा गोंधळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
त्यानिमित्त धार्मिक कार्यक्रम, ओटी भरणे, महाआरती, महाप्रसाद तसेच देवीचा गोंधळ जागरण होणार आहे.
त्यानंतर रात्री १०.३० वा. २०-२० डबलबारी भजनाचा जंगी सामना श्री भुतेश्वर प्रासादिक भजन मंडळ खुडी देवगड बुवा-संतोष दत्ताराम जोईल, गुरुवर्य – श्रीधर मुणगेकर बुवा, पखवाज- अक्षय मेस्त्री, तबला- मांगीरीश घाडी विरुध्द श्री विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळ, परेल बुवा-दुर्वास विश्वनाथ गुरव , गुरुवर्य- प्रमोद हर्याण बुवा पखवाज – महेश परब , तबला- कु. शुभम कावले होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन परब कुटुंबिय यांच्यावतीने करण्यात आले आहे.

