1.92 कोटी विद्यार्थ्यांतून कु. शमिका सदू गवंडी देशातील टॉप 100 मध्ये

1.92 कोटी विद्यार्थ्यांतून कु. शमिका सदू गवंडी देशातील टॉप 100 मध्ये

*कोंकण एक्सप्रेस*

*1.92 कोटी विद्यार्थ्यांतून कु. शमिका सदू गवंडी देशातील टॉप 100 मध्ये*

*सिंधुदुर्ग/ शुभम गवस*

कास गावासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी कु. शमिका सदू गवंडी हिने केली आहे. शिक्षण मंत्रालय व संरक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट वीर गाथा 5.0’ या राष्ट्रीय उपक्रमात तिची निवड झाली आहे.
या स्पर्धेत भारतातील 36 राज्ये व केंद्रशासित प्रदेश तसेच 18 देशांतील 91 शाळांमधून तब्बल 1.92 कोटी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून निवड झालेल्या 100 विद्यार्थ्यांमध्ये शमिकाने 23 वा क्रमांक मिळवला आहे.
या यशाबद्दल तिला ₹10,000 रोख बक्षीस, प्रशस्तीपत्र व राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळणार असून 25 जानेवारी 2026 रोजी दिल्ली येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते तिचा गौरव होणार आहे. तसेच तिला गणतंत्र दिन परेड पाहण्याचा मान मिळणार आहे.
या यशात जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कास नं. 1 च्या मुख्याध्यापिका व शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच आई-वडील सदू कृष्णा गवंडी व भागिरथी गवंडी आणि भावाचे सहकार्य मोलाचे ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!