सांडवे येथे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त वनराई बंधारा

सांडवे येथे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त वनराई बंधारा

*कोंकण एक्सप्रेस*

*सांडवे येथे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त वनराई बंधारा*

*शिरगांव / संतोष साळसकर*

अन्न व कृषी (FAO) संघटनेने २०२६ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातील सांडवे येथे कृषी विभागाच्या वतीने महिला शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागातून व श्रमदानाच्या माध्यमातून सांडवे-परबवाडी नजिक ओहळावर वनराई बंधारा उभारण्यात आला.
या कार्यक्रमात महिलांचे कृषी क्षेत्रातील योगदान अधोरेखित करत तालुका कृषी अधिकारी श्रीमती आरती पाटील यांनी मार्गदर्शन केले. महिला शेतकऱ्यांचे शेतीतील महत्त्वपूर्ण योगदान समाजासमोर आणणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सांडवेचे सरपंच सुहास परब, उपसरपंच,माजी सरपंच तुकेश परब, कृषी अधिकारी श्रीमती मानसी पवार, कृषी अधिकारी श्री अमोल इढोळे, ग्रामपंचायत अधिकारी श्री संदीप पवार तसेच परिसरातील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!